ऊर्जानगर :- दिनांक १६ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी चे औचित्य साधून योग विद्या धाम ऊर्जानगर (चंद्रपूर) तर्फे सामुहिक सूर्यनमस्कार घेण्यात आले. योग विद्या धाम ऊर्जानगर हि संस्था योग विद्या गुरुकुल नाशिक संलग्न असून योग क्षेत्रात अग्रगण्य आहे आणि योगाभ्यासातिल विविध शासनमान्य अभ्यासक्रम चालवते. हा कार्यक्रम अधिकारी मनोरंजन केंद्राच्या मोकळ्या पटांगणात सकाळी ७:०० ते ८:०० या कालावधीत घेण्यात आला. सामुहिक सूर्यनमस्कारासाठी एकूण ३२ साधकांनी आपला सहभाग नोंदवला.
प्रत्येक साधकाने प्रत्येकी १४ असे एकूण ४४८ सूर्यनमस्कार यानिमित्ताने घेण्यात आले.तत्पूर्वी नवीन साधकांना पूर्वतयारी व सूर्यनमस्कार साधना करता यावी याकरिता दिनांक ०५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत योग शिक्षक विशाल फिसके यांनी शाखेतर्फे नि:शुल्क सूर्यनमस्कार साधना वर्ग पार पाडला.
हा कार्यक्रमात रथसप्तमी निमित्त माहिती शेखर सरकार यांनी दिली तसेच विशाल फिसके व साधना चव्हान यांनी उपस्थित साधकांचे सामुहिक सूर्यनमस्कार घेतले.
या कार्यक्रमाच्या आयोजन, नियोजन व यशस्वितेसाठी शाखेचे सर्व योगशिक्षक शेखर सरकार, विशाल फिसके, अमोल जतकर, राहुल महाजन, विक्रांत सूर्यवंशी, अर्चना बनसोड, कोमल भागवत, नेहा महाजन, साधना चव्हान, पूनम वरुडकर, ममता भोंगाडे, रश्मी पाटोळे यांनी आपले बहुमुल्य योगदान दिले. योग विद्या धाम ऊर्जानगर शाखेतर्फे निरंतर योग प्रवेश, योग परिचय, योग संजीवन, सूर्यनमस्कार साधना, बाल संस्कार, उंची संवर्धन व योग सराव वर्ग वर्षभर घेण्यात येतात.