मूल प्रतिनिधी
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्याने मुल शहरातील भाजप नेते प्रशांत समर्थ यांनी ४ हजार लाडूचे पॅकेट जुना मुल म्हणुन परिचित असलेल्या परिसरात वाटून आनंदोत्सव साजरा केला.
संपूर्ण हिंदू समाजाच्या आणी भारतीयांच्या आस्थेचा विषय असलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्याने मुल शहरात विविध सामाजिक संघटना कडून आनंद उत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. भाजप नेते माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी सुद्धा जुना मूल म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या परिसरात बुंद्याच्या लाडूचे ४ हजार पॅकेट घरोघरी वाटून आनंद साजरा केला.
आर्य वैश्य आणी अग्रवाल समाजातर्फ ही प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्याने विविध उपक्रम राबवण्यात आले.