गोंडपिपरी ( सुरज माडुरवार) गोंडपिपरी तालुक्यात गेल्या काही दिवसात अवैद्य उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू होते.त्यानंतर एका रेती घाटावर सरपंच व तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षा वर झालेल्या हल्ल्यामुळे तालुका हा चर्चेत आला होता मोठ्या प्रमाणात महसूल विभागावार ताशेरे ओढण्यात आले होते.नव्यानेच रुजू झालेल्या मंडळ अधिकारी सुकेशनी कांबळे यांच्या धडक कारवाईने अवैध गौण खनिज तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
मागील आठवड्यात रेती तस्करांचा सरपंचावर हल्ला केल्याने एकच खडबड उडाली होती .त्यानंतर रेती तस्करांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी जोर धरू लागली.त्यानंतर महसूल विभाग ॲक्टिव झाले आणि फिरते पथक गठित करून रेती तस्करीला लगाम लावला. वरोरा येथून गोंडपिंपरी येथे नुकत्याच रुजू झालेल्या मंडळ अधिकारी सुकेशनी कांबळे यांनी गुप्त माहितीच्या आधारावर बोरगाव येथे दि.(९ )मंगळवारी दुपारी ३ वाजता दरम्यान मुरूम मिश्रित माती अवैद्य वाहतूक करताना चार ट्रॅक्टर आढळले असता चौकशी करून उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाळे ,तहसीलदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात ट्रॅक्टर पकडून त्यांच्यावर कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.कारवाई दरम्यान तलाठी सुरज राठोड,दिपक झाडे,पूजा बोरकर यांची उपस्थिती होती. मंडळ अधिकाऱ्यांनी केलेल्या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे