सावली:- नववर्षाच्या शुभमुहूर्तावर दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी शिवराजे युवा नाट्य कला मंडळ मौजा- चिखली तालुका सावली जि.चंद्रपुर यांच्या सौजन्याने, सामाजिक, लावणीप्रधान,विनोदाने नटलेले तिन अंकी नाटय पुष्प संगीत- नवसाच पोर या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
या नाटकाचे उद्घाटक खासदार अशोक नेते यांनी दूरध्वनी द्वारे संवाद साधून संपन्न केला.या नाटकांच्या उद्घाटन समारंभ सोहळा प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना मी मागील वर्षी चिखली या गावी आलो तेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सेवा पंधरवडा या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबवुन हा कार्यक्रम आयोजित केला होता.
त्यावेळी मला या कार्यक्रमाच्या वेळी येथील गावच्या नागरिक तथा भाजपा महिला आघाडी च्या नेत्या प्रतिभा बोबाटे यांनी मला निदर्शनास आणुन दिले होते की आमच्या गावातील हनुमान मंदिर हे अनेक वर्षापासून उघडयावर आहे त्या ठिकाणी चावडी बांधकाम दिल्यास फार चांगले हिताचे काम होईल.यासाठी माझ्या कडे अनेकदा मागणी व पाठपूरावा, निवेदन सुद्धा देण्यात आले होते.
या संबधित मला माझे सोशल मीडिया प्रमुख दिवाकर गेडाम यांनी निदर्शनास आणुन देत त्यांच्या मागणीला मी मान्य करित माझ्या स्थानिक विकास निधी अंतर्गत हनुमान मंदिराला सात लक्ष रूपयांचे चावडी बांधकाम मंजूर केले . यांचा चांगला लाभ गावकऱ्यांनी घ्यावा. लवकरच या बांधकामाचे भूमिपूजन होईल.यावेळी समस्त जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा देत हे नविन वर्ष सर्वांसाठी सुख समृद्ध आनंदायी, आरोग्यदायी जावो असे वक्तव्य या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.
याप्रसंगी प्रामुख्याने मंचावर गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,माजी जि.प बांध.सभापती संतोष तंगडपल्लीवार,युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष विनोद धोटे,भाजपा महिला आघाडीच्या नेत्या तथा ग्रा.प.सदस्या प्रतिभा बोबाटे, नगरसेविका निलम सुरमवार, शशीकांत म्हस्के,कूमोद बोबाटे, यशवंत बोरकुटे,करोडकर ,रेखाताई बानबले,तसेच मोठ्या संख्येने नाट्य रसिक बंधू भगिनीं उपस्थितीत होते.