पुलगाव – अकोला येथून नागपूरकडे निघालेली कार वर्धा अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर उलटली . कारमधून प्रवास करणाऱ्या सहा व्यक्तींपैकी आजोबा, नातू व नात हे तिघे गंभीर जखमी झाले .त्यांना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (रेल्वे) रुग्णालयात तातडीने उपचाराकरिता नेण्यात आले.
हा अपघात रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास झाला.
अकोला येथील रहिवासी असलेले प्रशांत जगन्नाथ गोरे (35) हे एम एच 30 ए एफ 77 42 क्रमांकाच्या कारणे नागपूर येथे जाण्याकरिता निघाले होते. कार मध्ये प्रशांत त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी व आई वडील असे सहा व्यक्ती प्रवास करीत होते .समृद्धी मार्गावरून त्यांचा प्रवास दुपारी सुरू होता .वर्धा व अमरावती जिल्ह्याची सीमा असलेल्या वर्धा नदीच्या पुलाजवळ झाडा परिसरात त्यांची कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली .कारमधून प्रवास करणारे सर्वच कार मध्ये अडकून पडले त्यावेळी समृद्धी मार्गावर दोन्ही बाजूला वाहने धावत होती .हा अपघात झाला तेव्हा एकही वाहन घटनास्थळावर थांबले नाही. अपघाताची माहिती देण्यात आली. 30 मिनिट घटनास्थळावर महामार्गाची यंत्रणा पोहोचली नाही .या अपघातात जगन्नाथ गोरे यांच्यासह नातू व नात गंभीर जखमी झाले आहे. विलंबाने घटनास्थळावर आलेल्या रुग्णवाहिकेतून या तीनही जखमींना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (रेल्वे) येथील रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले .कारचा चालक प्रशांत त्याची पत्नी व आई यांना देखील मार लागला. प्रशांत वगळता इतर सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले प्रशांत मात्र घटनास्थळावर उपस्थित होता .अपघाताची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्राथमिक तपासाला प्रारंभ केला. समृद्धी महामार्ग लगत असलेल्या शेतांमध्ये कार्यरत असलेले शेतकरी शेतमजूर यांना जोरदार आवाज ऐकू आला तेव्हा सर्वांनी अपघात झाल्याचे गृहीत धरले. पण समृद्धी मार्गावर इतरांना जाता येत नसल्यामुळे घटनास्थळी कुणालाही मदतीकरिता पोहोचता आले नाही असे शेतकरी शेतमजूर सांगत होते. वृत्तलिहेपर्यंत या अपघातातील जखमींची नावे कळू शकली नाही.