गोंडपिपरी :-चंद्रपूर जिल्ह्यात २६ ते २८ नोव्हेंबर कालावधीत अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे करण्याचे निर्देश शासणाने दिले. निर्देशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदार, सवर्ग विकास अधिकारी,तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले आहे.
गोंडपिपरी तालुक्यात बहुतांश गावात सोमवारी दि (२७) अवकाळी पावसाने झोडपले. धान पिके कापून असल्याने अतोनात नुकसान झाली.रब्बी पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
दि.(२७) सोमवारी सकाळी ९ वाजता अवकाळी पावसाने गोंडपिपरी तालुक्यात अनेक गावात जोरदार हजेरी लावली.अचानक भरून आलेले आभाळ,सोसाट्याच्या वारा,अचानक कोसळू लागलेल्या धरामुळे भातपिके आडवे पडले.यंदा अतिवृष्टीमुळे तालुक्यात दुबार तीबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागली आधीच कंबरडे मोडले असताना झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची झोप उडवली.काही शेतकरी सकाळपासून धानाचे पुंजने बनवत असताना दानादान झाली धान पिकाच्या ढगात पाणी शिरल्याने मोठा फटका बसला असून हातात आलेले पीक जाण्याच्या मार्गावर आहे.अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार शुभम बहाकर यांनी बुधवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत थेट वढोली व अनेक गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.
३३ टक्यांपेक्षा जास्त शेतपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याबाबतचा निधी मागणी अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहे.त्या दृष्टीने काम सुरू असून शेतकऱ्यांनी थेट सवांद साधून नुकसानीची माहिती द्यावी.कृषी,तलाठी सर्व अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहे. –
शुभम बहाकर तहसीलदार गोंडपिपरी