गोंडपिपरी –
खेडी गोंडपिपरी रस्ता निर्माण कामामध्ये भ्रष्टाचाराची परी सीमा ओलांडाचे काम कंत्राटदारकमार्फत सर्वात सुरू असून शासकीय अधिकाऱ्याकडून या सर्व प्रकरणात उघड डोळे झाक केली जात असल्याने शासनाचा करोड रुपयाचा महसूल चोरला जात आहे.गोंडपिपरी शहरात व वडोली,गोंडपिपरी, धाबा पर्यंत अर्धवट निर्माण कामामध्ये आतापर्यंत करोड रुपयांचा वर भ्रष्टाचार केला गेला असून रस्ता निर्माण करणाऱ्या कंत्राटदाराकडून पूर्वीच्या मजबूत डांबर रोड फोडून त्या रस्त्याचा मलमा रोज मोठ्या प्रमाणात विक्री केला जात आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराकडून कोटी रुपयांच्या घरात शासनाचा महसूल विकला जात असून याच रस्त्याच्या खोदकामासाठी शासनाकडून कोटी रुपये वसूल केले जात आहे.असाच एकंदरीत दुहेरी पद्धतीने भ्रष्टाचार सध्या गोंडपिपरी शहरात सुरू आहे.रस्ता निर्माण कामात शासनाच्या निष्कर्षाला धाब्यावर बसवीत मोठा भ्रष्टाचार करून हा रस्ता निर्माण केला जात असून पुढे पाठ मागे सपाट अशा पद्धतीचा हा रस्ता सध्या खेडी,गोंडपिपरी,धाबा निर्माण केला जात असल्याने पुढील काही महिन्यानंतर हा निर्माण रस्ता गावातील नागरिकांसाठी मोठे डोकेदुखी ठरणार आहे मागील पाच वर्षापासून अशाच पद्धतीने रस्ता निर्माण करण्यात येत आहे हा रस्ता निर्माण करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने आता या रस्त्यावरील किती उकडली असून रोज ही गिट्टी उडून अनेक व्यक्ती जखमी होत आहे निष्कृष्ट दर्जाचा केला जात असलेला विकास हा विकास नसून शहर भकास करण्याचा अजेंडा असल्याचे विरोधक देखील मोठ्या प्रमाणात बोलू लागले आहे शहरातील नागरिकाकडून देखील अशा पद्धतीने निर्माण भ्रष्टाचाराच्या रस्त्यावरील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे
शासनाच्या रस्त्याच्या बांधकामात निघाले साहित्य, मलमा हे शासकीय मालमत्तेचे असताना त्यांनी परस्पर विक्री करण्याचे आदेश कंत्राटला दिले कोणी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता यांना दिले आहे