गोंडपिपरी (सुरज माडूरवार)
नेहमीप्रमाणे कापूस तोडणीनंतर कापूस एका शेतकऱ्याने अंगणात साठवून ठेवले.मात्र रात्रीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी डाव साधत चक्क का लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सध्या कापूस तोडणीचा हंगाम सुरू असून सोबतच धान कापणीला देखील वेग आलेला आहे.शेतकरी कापूस तोडणीनंतर सकाळी त्याचे वजन करून मजुरांना पैसे देतात व त्यांचे कापूस साठवायचे कापडे देतात आणि मजूर तेच कापडे घेऊन कापूस तोडणीला थेट शेतात जात असतात ही पद्धत तालुक्यात सर्वत्र पाहायला मिळते.अशातच गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील शेतकरी नरेंद्र कोहपरे यांनी दि.(१९)रविवारी कापूस तोडणीनंतर कापसाचे गाठोडे नेहमीप्रमाणे अंगणात ठेवले व कुटुंबीय झोपी गेले.सकाळी कापसाचे वजन करण्यासाठी बघतात तर गाठोडेच चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली.दुबार तिबार पेरणीमुळे शेतकरी चिंताग्रस्त असून अध्यापही शेतकऱ्यांना पिक विमा,अतिवृष्टीचे पैसे अजूनही सरकारकडून मिळाले नाही,पिकांना योग्य भाव नाही आर्थिक विवंचनेत असताना अशी घटना घडल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे.गावातील बहुतांश शेतकरी आपल्या अंगणामध्ये कापूस ठेवतात पण या चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बाहेर ठेवलेल्या कापसाची सर्वच शेतकरी सावधानता बाळगत सुरक्षित ठिकाणी विल्हेवाट लावतानाचे चित्र दिसत आहे.