मूलचेरा:तालुक्यातील भवानीपूर येथे दरवर्षी दीपावली निमित्त पंचमी च्या शुभ मुहूर्तावर काली मातेचे स्थापना करून पूजा अर्चा केले जाते.
जय माँ भवानी काली पूजा कमेटी,भवानीपुर च्या विनंती ला मान देऊन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक आत्राम यांनी काली मातेचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केले.
यावेळी कमेटीचे अध्यक्ष नरेश ढाली,उपाध्यक्ष सूरज रॉय,शुशंकर ब्यापारी,ब्रोजोनाथ सरकार,राजा बहादूर,दिनेश बहादूर,निर्मल शील,संजू सरकार,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,साईनाथ नागोसे,अंकुश दुर्गे,संदीप बडगे,जुलेख शेख,विनोद कावेरी सह परिसरातील भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.