अहेरी : तालुक्यातील नांदीगाव येथील प्रतिष्ठित नागरिक दीपक गंगाराम सोयाम यांना काही दिवसा पूर्वी अल्सर पोटातील आजार असल्याने दीपक सोयाम यांना नागपूर येथील दवाखान्यात उपचारासाठी भर्ती करण्यात आले होते.ईश्वरा कृपेने त्यांची प्रकृती ठीक झाली असून.सोयाम कुटूंबियांची घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांना स्वगवी नंदिगांव येण्यासाठी अडचण भासत होती.
“ही”अडचण आविसं अजय मित्र परिवाराचे पदाधिकारी कडून आविसं अजय मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना माहिती देताच.सोयाम कुटुंबातील नातेवाईकांना अहेरी अजय कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे बोलावून सोयाम कुटुंबातील अडचण जाणून घेऊन.त्यांना स्वगवी येण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली.अजून कोणत्याही मदतीसाठी माझ्याशी सरळ संपर्क करा म्हणून सोयाम कुटुंबातील नातेवाईकांना सांगण्यात आले.यावेळी सोयाम कुटुंबातील नातेवाईकांनी अजय कंकडालवार यांचे आभार मानले.
यावेळी आविसं अजय परिवाराचे पदाधिकारी देवलमारी ग्रामपंचायतचे उपसरपंच हरीश गावडे,संदीप दुर्गे,श्रीनिवास राऊत,जगन्नाथ मडावी,माजी उपसरपंच मोसम दिलीप मडावी,रुपेश कनाके,सुधाकर आलाम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सोयाम कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.