गडचिरोली : दिवाळीच्या निमित्ताने गडचिरोली शहराच्या विविध भागातील गोरगरीब नागरिकांना खासदार अशोक नेते यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे आणि पदाधिकाऱ्यांनी मिठाई, तसेच थंडीपासून बचावासाठी ब्लँकेटचे वाटप केले. शुक्रवारी गोकुळनगर आणि विसापूर मार्गावर अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला. यावेळी त्या नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद मानसिक समाधान देणारा आहे, अशी भावना यावेळी खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी ‘गरीबों के सम्मान में, भाजपा मैदान मे’ हा नारा प्रत्यक्षात उतरवत हा स्तुत्य उपक्रम राबविला. दिवाळीसारख्या सणाला गडचिरोली शहर परिसरातील फुटपाथवर राहणाऱ्या गरीब, भटक्या लोकांना हे साहित्य वाटण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने खासदार अशोक नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,माजी जि.प अध्यक्ष समया पसुला,शहर महामंत्री विवेक बैस,उराडे ,माजी नगराध्यक्ष भुपेश कुळमेथे,युवा नेते हर्षल गेडाम,गणेश नेते,बोमनवार , शयाम वाढई,विनोद देवोजवार, दतु माकोडे,वच्छला मुंनघाटे, पुष्पा करकाडे, तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.