गोंडपिपरी –राजुरा विधानसभा क्षेत्राचा विकास करण्याचे ध्येय उराशी बाळगून समाजकारणातून राजकारणात प्रवेश केला.पाठीशी असलेली जनता हीच माझी खरी ताकद आहे.राजुरा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी अहोरात्र झटलो व झटत राहील गोंडपिपरीतील नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सेवेसाठी जनसंपर्क कार्यालय नेहमी खुले राहणार.असे प्रतिपादन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.
दि.(१०) शुक्रवारी नागरिकांच्या सेवेसाठी तालुका काँग्रेसचे काळे कॉम्प्लेक्समध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र बट्टे,तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,सरपंच देविदास सातपुते,कार्याध्यक्ष निलेश संगमवार,शहर अध्यक्ष राजू झाडे,तालुका उपाध्यक्ष नीतेश मेश्राम,ग्रा.पं सदस्य महेंद्र कुनघाटकर,युवक तालुका अध्यक्ष विपिन पेदीलवार,बाजार समिती संचालक संतोष बंडावार,अशोक रेचंनकर,गौतम झाडे,जितेंद्र गोहणे,शंभू येलेकर,महिला तालुका अध्यक्ष सोनी दिवसे,बाजार समिती माजी सभापती सुरेश चौधरी, राजिवसिंह चंदेल यांच्यासह तालुक्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती