मुलचेरा : आंतरराष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू तयार करायचा असेल तर ग्रामीण भागातील खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण व क्रीडा मैदान उपलब्ध करून दिले पाहिजे.या दृष्टिकोनातून गोंडवाना क्लब तर्फे गावपातळीवर आयोजित केलेली व्हॉलीबॉल स्पर्धा प्रशंसनीय आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.
यावेळी सहउदघाटक म्हणून माजी जि.प.सदस्य सुनीता कूसनाके, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चुटूगुंट्टा ग्रामपंचायतचे सरपंच साधना मडावी, प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार माजी जि.प.सदस्य अजय नैताम अशोक येलमुले,सुरेश आत्राम,वेंकटेश धानोरकर,कालिदास कुसनाके,श्रीकांत समदार,कमल बाला,राकेश सडमेक,गुरुदास कोरेत, मारोती नैताम, गुलाब सडमेक,रविश तलांडे,रंजित कोरेत,किशोर नैताम, पंकज नैताम,दिनेश मडावी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना गावातील युवा पिढीला क्रीडा क्षेत्रात पुढे जायचे असेल तर विविध खेळात सातत्य राखणे गरजेचे आहे.त्यासाठी गावात भव्य क्रीडांगण आवश्यक असून त्यासाठी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.
व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन होताच अजय कंकडालवार यांनी गावातील विविध समस्यांवर चर्चा केली.तसेच सरपंच, उपसरपंच यांना विकास कामासाठी पुढाकार घेऊन गावाचा विकास साधण्याचे आवाहन केले.दरम्यान जय गोंडवाना क्लब टिकेपल्ली यांच्या वतीने आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी गावात पोहोचताच गावकऱ्यांनी पाहुण्याचे ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत केले.