वरोरा प्रतिनिधी
वरोरा तालुक्यातील अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या सालोरी येथील अंदाजे ३ हजार लोकसंख्या व १९७० मतदार संख्या असलेल्या ९ सदस्यीय ग्रामपंचायतीवर काँग्रेसच्या प्रतिभा शेरकुरे सरपंच पदी निवडून आल्या असून काँग्रेसचेच राहुल मारोती शेरकुरे, सीमा तुलसीदास मगरे, संगीता नागोराव ननावरे, रामचंद्र रघुनाथ उईके हे सदस्यपदी निवडून येऊन सालोरी ग्रामपंचायत वर बहुमताने सत्ता काबीज केली आहे.
मागील २०-२५ वर्षापासून सालोरी ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी व इतर पक्षाचा वर चष्मा होता. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक गायकवाड हे सलग दहा वर्ष सालोरी च्या सरपंच पदी विराजमान होते हे विशेष. त्यामुळे सालोरी ग्रामपंचायत राष्ट्रवादीचा गड मानल्या जात होता. त्या राष्ट्रवादीच्या गडाला आज खिंडार पाडत काँग्रेसने एक हाती सत्ता काबीज केली.
ही निवडणूक काँग्रेसने वरोरा- भद्रावती विधानसभेच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर यांच्या नेतृत्वात लढविली होती. त्यात त्यांना यश आले असून विजयी करण्यासाठी विद्यार्थी काँग्रेस (NSUI) तालुकाध्यक्ष रुपेश तेलंग, युवक काँग्रेस उपाध्यक्ष राहुल नन्नावरे, सेवा सहकारी संस्था अध्यक्ष अरुण शेरकुरे, भुषण पाटील, अमोल शेलकर,प्रभुदास पाटील, मधुकर पुसनाके, राजेंद्र मडावी, मारोती मिलमिले, किशोर मडावी, मिथुन आत्राम, निलेश गायकवाड, हनुमान घरत, अनिल शेरकुरे, विकास जांभुळे, मारोती चौखे, नामदेव मगरे, मनोहर रंदई, संजय काळमेंघे, कैलास तुमसरे,चंपत ढोक,कवडू वाघ, सचिन शेंडे, स्वप्निल दडमल यांनी अथक परिश्रम घेतले.