चिमूर :- प्रवाहित विद्युत तारेच्या स्पर्शाने बालकाचा मृत्यू झाल्याची घटना चिमूर तालुक्यातील मदनापूर येथे घडली आहे.
विष्णू विनोद कामठी हा गावातील मुलांसोबत दररोज पहाटे व्यायामासाठी जात होता.आज सकाळी जय लहरी जय मानव विद्यालयाच्या खुल्या पंटागणात गावातील मुलांच्या सोबत व्यायाम करीत असताना त्याला शौचास लागली त्यासाठी त्याने पटांगणाला लागून असलेल्या गोवर्धन रंदिये यांच्या शेतातील बोडी वरती शौचालय करून परत येते वेळी शेतकऱ्यांनी वन्यप्राणी बंदोबस्त साठी लावलेल्या तारेला स्पर्श झाला. यातच त्याचा मृत्यू झाला.पुढील तपास पोलिस करीत आहेत.