वरोरा :- टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजी जाधव यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून,टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजी जाधव, वस्ताद जालिंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच टायगर ग्रुप वरोरा चे युवा सामाजिक कार्यकर्ता रिषभ रठ्ठे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा टायगर ग्रुप च्या सदस्यांनी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे गरजू रुग्णांना फळ वाटप,बिस्कीट वाटप हा सामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा केला.
टायगर ग्रुप वरोरा हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या पद्धतीने गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करीत असते.अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम वरोरा टायगर ग्रुप च्या वतीने होत असते.ही एक वरोरा शहारात विशेष बाब आहे.त्यांच्या कार्याचे कौतुक शहरात होत आहे.यावेळी रिषभ रठ्ठे आणी मारोती नामे यांनी रुग्णांशी संवाद साधताना आव्हान केले की,कुठल्याही सामाजिक क्षेत्रात मदत हवी असल्यास टायगर ग्रुप शी संपर्क साधा असे सांगण्यात आले. रिषभ रठ्ठे यांचे असे म्हणणे आहे की,प्रत्येक जण स्वतःसाठी जगतो पण रुग्णाची सेवा करण्यात जो आनंद मिळतो तो इतर कुठेही मिळत नाही.यावेळी वाढदिवसा निमित्य उपस्थित असलेले वरोरा चे सामाजिक कार्यकर्ता प्रवीण सुराणा,प्रवीण गंधारे,टायगर ग्रुप वरोरा चे रिषभ रठ्ठे,मारोती नामे, टायगर ग्रुप वणी चे प्रतिक गौरकार,संपूर्ण मित्रपरिवार,तसेच टायगर ग्रुप नागरी चे अमित थाटे,टायगर ग्रुप केम चे सामाजिक कार्यकर्ता नितेश कातकडे,आदेश गायकवाड टायगर ग्रुप माढेळी चे मुकेश पाटील टायगर ग्रुप पांझूर्णी चे प्रसाद गमे,अजय जांभुळे,टायगर ग्रुप वरोरा चे सदस्य वैभव टिपले, प्रवीण खिरटकर,विक्की गवई, बादल ठावरी, बादल जांभूळकर, महेंद्र तामगाडगे,ओम कार्लेकर, रोशन कुळसंगे,ई.सदस्यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस सोहळा पार पडला.