कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या उपचारासाठी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत
*अहेरी:-* तालुक्यातील बोरी येथील रहिवासी विजय पुल्लीवार यांना तोंडाचा कॅन्सर झाला असून हैद्राबाद येथे सद्या त्यांचे उपचार सुरू आहे,सद्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यानें अशात त्यांच्या कुटुंबाकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नव्हते.त्यामुळे संपूर्ण कुटुंब विवंचनेत सापडला होता.
सदर माहिती सामाजिक कार्यकर्ते यांना कळाली आणि त्यांनी ही गोष्ट माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कानावर टाकली लगेच अम्ब्रिशराव आत्राम यांनी विजय पुल्लीवारच्या उपचाराकरिता दहा हजार रुपयांची आर्थिक मदत क्षणाचाही विलंब न करता पुल्लीवार यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत केली.
परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे समोरील उपचारासाठी घरची परिस्थीती बेताची असल्याने उपचारासाठी पैशाची अडचण भासत होती.इतक्यात राजे अम्ब्रिशराव आत्राम पुल्लीवार कुटुंबियांच्या मदतीला सरसावले.त्यांचे खंदे समर्थक आणि कार्यकर्ते यांनी राजेंच्या माध्यमातून विजय पुल्लीवार यांच्या कुटुंबियांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली.
इतकंच नव्हे तर मदतीचा हात देत तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनाचा लाभ ही विजय पुल्लीवार यांच्या कुटूंबाला मिळण्यासाठी मदत करणार असे सांगून समोरही सर्वतोपरी पुन्हा सहकार्य करण्याचे आश्वासन सुध्दा यावेळी राजे यांनी दिले.
यावेळी संपूर्ण पुल्लीवार कुटुंबाने राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे आभार मानले.विशेष बाब म्हणजे अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम हे नेहमीच आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील गरजूंना आर्थिक मदत करीत असतात.
यावेळी भाजप चे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.