वरोरा (चंद्रपूर )- केंद्रीय मानवाधिकार संघटनचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ. अंकुश आगलावे यांनी जय हिंद क्रीडा मंडळ नागरी व्दारे आयोजित कबड्डी सामान्याच्या उद्घाटन प्रसंगी खेळाचे फायदे समाजावून सांगत कबड्डीमुळे शरीर सुदृढ व निरोधी राहते तसेच निर्णय करण्याची क्षमता वाढते व परस्पर सहकार्याची भावना निर्माण होत असल्याचे प्रतिपादन केले.
या कबड्डी सामान्याचे दोन दिवसीय पुरूषांचे व एक दिवसीय महिलांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि. 12 फेब्रुवारीला गजानन ले आउट,चे मैदान नागरी येथे करण्यात आले होते.
डॉ. आगलावे म्हणाले की भारतात 2 प्रतिशत नागरिकांना सरकारी नौकरी असून दिवसेंदिवस बेरोजगारीचा प्रश्न वाढत आहे. शेतकऱ्यांवर अन्याय, नापीकी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी असे अनेक प्रश्न निर्माण होत असून यातून मार्ग काढणे गरजेचे आहे तसेच सद्यःस्थिती महाराष्ट्र शासनाचे धोरण हे इंग्रजापेक्षाही जुलमी असल्याचे मत डॉ. आगलावे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात सर्व खेडयात व गावांत गुरूदेव सेवा मंडळाच्या वतिने दारूबंदीचा ठराव घेवून निषेध नोंदविला पाहिजे असे म्हणाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र शिंदे युवा बिजनेस मॅन भद्रावती व उद्घाटक म्हणून डॉ. अंकुश आगलावे या उपस्थिती होती. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रकाश बावणे, सरपंच नागरी, पोलीस पाटील पुष्पाताई मेश्राम, दत्ताभाऊ बोरेकर माजी उपसभापती पं.स. वरोरा, विकासराव डोंगरे पं.स.सदस्य नागरी, इस्तेहाक खां पठाण माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते, प्रमोदराव धात्रक संचालक खरेदी विक्री वरोरा, माजी प्राचार्य अय्युब खां पठान , नेहरू चौधरी, रपेश कोरेकार, गजानन वैद्य, नेपालसिंग भांेड आदी उपस्थित होते .