वरोरा :- मद्याच्या नशेत भावी पिढी उद्ध्वस्त होत आहे. असे असतानाही निव्वळ महसूल मिळतो म्हणून राज्य शासनाकडून स्वत:च्या नियमांनाच पायदळी तुडवले जात आहे. शहरातील विदेशी दारूची दुकाने सकाळी ११.३० वाजेनंतर उघडण्यात यावीत, असा शासकीय नियम आहे. प्रत्यक्षात मात्र, सकाळी तांबडे फुटत नाही तोच तळीरामांची सोय होताना दिसत आहे. स्थानिक पातळीवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे होणारे दुर्लक्ष म्हणा किंवा आर्थिक संबंधांचा परिणाम, सकाळपासूनच शहरात राजरोसपणे मद्याची विक्री केली जात असल्याचे पाहणीत दिसून आले आहे.सामान्यांना कायद्याचा धाक दाखवणारे स्थानिक पोलिस मात्र दारू दुकानांविरोधात कारवाई करताना ‘डगमगताना’ दिसत आहेत. यामुळे सामान्यांना मद्यपींच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे.दारूसाठी व्यसनमुक्ती धोरण व उत्पादन शुल्क विभागाच्या कायद्यांना मूठमाती दाखवण्याच्या प्रकारावर सह्याद्रीचा राखणदार चा स्पेशल रिपोर्ट उद्याच्या डिजीटल अंकात …