एटापल्ली :-जल जिवन मिशन कार्यक्रम अंतर्गत एटापल्ली तालुक्यातील मौजा-पंदेवाही येथे खासदार अशोक नेते यांच्याहस्ते नळ पाणी पुरवठा टाकीचे लोकार्पण संपन्न झाला.
केंद्र शासनाची पुरस्कृत योजना जलजीवन मिशन हर घर जल,हर घर नल ,या योजनेचा लाभ प्रत्येक गावांनी घ्यावा.पाणी हे जीवन आहे. पाण्यासाठी अनेक गावांतील ग्रामीण भागांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.यासाठी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी हर घर नल,हर घर जल हि योजना आणली. या योजनेअंतर्गत नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी या योजनेचा उद्देश असुन या योजनेद्वारे प्रत्येक घरात पिण्याचे पाणी मिळावे. हा योजनेचा उद्देश आहे. यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत ही योजना जनतेसाठी लाभदायी. प्रत्येक गावांनी लाभ घेऊन, चांगला उपयोग करावा.असे त्यांनी आवाहन केले.
तब्बल पन्नास लाख रुपयांच्या निधीतून या योजनेचे काम करण्यात आले असून नुकतेच त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी प्रामुख्याने एटापल्ली भाजपा तालुकाध्यक्ष निखील गादेवार, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदिप कोरेत,युवा मोर्चा जिल्हा महामंत्री सागर डेकाटे, जिल्हा सचिव बाबुराव गंफावार,विजय नल्लावार,अशोक पुल्लुरवार, प्रसाद पुल्लुरवार, प्रसाद दासरवार,संपत पैदाकुलवार,प्रशांत मंडल,मनोज मुजुमदार,व इतर गावातील नागरिक आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.