भद्रावती (प्रतिनिधी) : स्थानिक नीळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती येथे डॉ. धनराज माने संचालक, उच्च शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी डॉ. धनराज माने यांचे स्वागत भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे यांनी शाॅल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तसेच डॉ.विशाल शिंदे सहसचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती व प्राचार्य डॉ. एल एस लडके यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या भेटीदरम्यान डॉ. धनराज माने यांनी संचालक मंडळ व प्राचार्य यांच्याशी विविध शैक्षणिक मुद्द्यावर चर्चा केली व महाविद्यालयाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी covid-19 च्या सर्व नियमाचे पालन करून उपस्थित होते.