स्थानिकांचीस सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक करा
गोंडपिपरी-
मागास व दुर्गम भागात राज्याच्या सीमेवर मोडणारा गोंडपिपरी तालुका अद्यापही हा अविकसित आहे. तालुक्यात कुठलाच उद्योग नसल्याने बेरोजगारांची मोठी फौज उभी झाली आहे.तरुणांना शेती शिवाय पर्याय नाही अशा स्थितीत बेरोजगारी ही तालुक्याची मोठी समस्या बनली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोंसरी व सुरजागड येथे मोठे उद्योग सुरू आहेत या उद्योगाच्या वाहतुकीमुळे गोंडपिपरी तालुक्याच्या मुख्य मार्गालगत असलेल्या गावांना अपघाताची मोठी भीती निर्माण झाली आहे.अनेकदा अपघातात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी नेमणूक करण्यात आली पण यातील अनेक सुरक्षा रक्षक हे बाहेरचे आहेत गडचिरोली जिल्ह्यातील आहे त्यामुळे स्थानिकांचा रोजगार ते हिरावून घेत आहेत.अशा स्थितीत स्थानिक तरुणांना रोजगार मिळणे अतिशय आवश्यक झाले करिता स्थानिकांना रोजगार मिळावा सोबतच आकसापूर,करंजी,धानापूर,जोगापूर गावात मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात कोंसरी व सुरजागड येथून लोहखनिज घेऊन जाणाऱ्या हायवा पार्किंग केल्या असतात त्यामुळे अपघातात वाढ झाल्याने मुख्य मार्गावर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी दि.(१८) सोमवारी शिवसेनेने राष्ट्रीय महामार्गवर नवेगाव वाघाडे टोल नाक्यावर तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन करत दोन तास वाहतूक अडवून धरली होती.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,उपनगराध्यक्ष सारिका मडावी,नगरसेवक यादव बांबोडे,नगरसेवक आशिष कावटवार,नगरसेवक बालाजी मेश्राम,शहर प्रमुख विवेक राणा,युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते,शहर उपप्रमुख रियाज कुरेशी,अशपाक कुरेशी,काशिनाथ पोटे,महेश श्रीगिरिवार,सुरज गोरंटवार,गौरव घुबडे,दर्शन वासेकर,गोकुल सोनटक्के,स्वप्नील नागपुरे,अनिकेत दुर्गे,पंकज डांगी,शुभम मेश्राम, संदीप लाटकर,अंकित भसारकर,विपीन मोरे,शुभम ढपकस,दीपक बावणे,अमोल कुकुडकर,संतोष उराडे,हिम्मत वाघाडे, बालू झाडे,धीरज मडावी,गुड्डू चुदरी,ग्रा पं सदस्य अनिता काशिनाथ पोटे यांच्यासह भंगाराम तळोधी,बोरगाव,चेकपिपरी, लिखितवाडा,धनापूर,व्यंकटपुर,वढोली,सुरगाव, सुपगाव चेक घडोली,पानोरा,दरूर,तारसा,करंजी,नवेगाव,वाघाडे,गोंडपिपरी सह अनेक गावातील नागरिकांची शेकडो च्या संखेने उपस्थिती होती
आंदोलन दरम्यान रुग्णवाहिका आली असता त्यांना आंदोलन कर्त्यांनी मार्ग काढून देत सामाजिक भान ठेवले त्याबद्दल कौतुक होत आहे.यावेळी ठाणेदार जीवन राजगुरू,तहसीलदार कदम व कंपनीच्या अधिकाऱ्यांना तालुका प्रमुख सुरज माडुरवारांच्या नेतृत्वात निवेदन देऊन ७ दिवसाचा अलटीमेट देण्यात आला.