वरोरा : शिवसेना (उबाठा ) वतीने केंद्र सरकार व राज्यसरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड करण्याकरिता “होऊ द्या चर्चा” हा कार्यक्रम वरोरा – भद्रावती विधानसभेतील प्रत्येक गावागावात राबविण्याच्या अनुषंगाने दिनांक १७ सप्टेंबर रविवारी स्नेहमिलन कार्यालय येथे शिवसेना उपनेते तथा कामगार नेते व माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या नेतृत्वात व माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील व जिह्वाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आढावा बैठक पार पडली.
केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासुन शासनाने विविध योजनाची प्रचंड जाहिरातबाजी केली, प्रत्यक्षात या सर्व योजना फसव्या व केवळ घोषणाबाजीच होत्या. मुद्रा लोन, उज्वला गैस, शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट, जन धन, स्वानिधी, किसान सन्मान योजना, जलजीवन अशा अनेक योजना योजनांतील सत्य काय ते गावा-गावात जाऊन लोकांना सांगावे व या सर्व योजना फसव्या असल्याचे उदाहरणे द्यावीत. येत्या १ ते १२ आक्टोबर दरम्यान प्रत्यक्ष जनतेत जाऊन या योजनांची पोल-खोल करावी, असे आवाहन शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांनी केले.
जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे म्हणाले कि, राज्यातील दुष्काळी परिस्थिती व त्यामुळे प्रचंड अडचणीत आलेला शेतकरी या बाबत सरकारची असणारी उदासीन भुमिका यावरही चर्चा करावी. संपूर्ण महाराष्ट्र भर होऊ द्या चर्चा अभियान राबविण्यात येणार असुन चंद्रपूर जिल्हयात ही मोहिम यशस्वी करण्यासाठी स्नेहमिलन कार्यालय सरदार पटेल वॉर्ड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी वरोरा व भद्रावती तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेऊन पुढील महिन्यात स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मदतीने वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रातील पंचायत समिती , जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावात ‘होऊ द्या चर्चा’ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मनिष जेठानी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख वसंता मानकर, शिवसेना विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, युवासेना जिल्हा सनमव्यक तथा माजी नगरसेवक दिनेश यादव, शिवसेना शहर संघटक तथा माजी नगरसेवक किशोर टिपले, भद्रावती माजी तालुका प्रमुख नागेंद्र चटपल्लीवार, शिवसेना शहर प्रमुख संदीप मेश्राम, शिवसेना शहरप्रमुख सरताज सिद्दकी,शिवसेना तालुका संघटक बाळा क्षीरसागर, भद्रावती पंचायत समितीचे माजी उपसभापती नागोजी बहादे,शिवदूत तथा सरपंच बालाजी जिवतोडे, शिवसेना माजी नगरसेविका सुषमा भोयर, शिवसेना उपजिल्हा सनमव्यक महिला संघटिका कीर्ती पांडे, शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे,शिवसेना तालुका प्रमुख विपीन काकडे,शिवसेना उपशहर प्रमुख गजु पंधरे, शिवसेना उपशहर प्रमुख मनिष दोहतरे, शिवसेना उपतालुका प्रमुख सागर पिपंळशेंडे,वाहतूक सेना तालुका प्रमुख रमेश सणस,युवासेना उपजिल्हाप्रमुख महेश जिवतोडे, बंडू पेटकर, बंडू खैरे,अनिल गाडगे, बाळू विरुटकर,साळवे गुरुजी,शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश कुरेकार,शिवसेना विभाग प्रमुख विशाल शेंडे, प्रकाश मडावी,ग्रामपंचायत सदस्य जिवतोडे,युवासेना तालुका प्रमुख ओंकार लोडे,युवासेना उपतालुका प्रमुख अमोल काळे, युवती सेना तालुका प्रमुख तेजस्विनी हनुवते, कपिल धकाते समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, युवती सैनिक उपस्थित होते.