वरोरा (चंद्रपूर ) शहरालगत असलेल्या मौजा बोर्डा येथील आदित्य उमेश येटे या ११ वर्षीय बालकाचा २८ जानेवारीला पतंग उडवीत असताना पतंगीचा धागा उच्च दाबाच्या विद्युत तारांना स्पर्श झाल्याने अपघात झाला असून नागपुर येथील एका खाजगी रुग्णालयात त्याचेवर उपचार सुरू आहे .
परिस्थिती हलाखीची असल्याने उमेश येटे यांनी मदतीची आवाहन केले होते . त्या आधारित“ साप्ताहिक सह्याद्रीचा राखणदार “मध्ये “बाबा मी बरा होईल ना“ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती .या बातमीची दखल घेत . बोर्डा येथील सामजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच धनराज आसुटकर यांनी व त्यांच्या मित्रपरिवारातर्फे ५ हजाराची आर्थिक मदत केली यावेळी राजू गोवरदिपे,योगेश रामटेके,प्रदीप घागी, दिनेश जीवतोडे,आशिष नागपुरे, चिराग पांढरे उपस्थित होते