नागपूर :- तेलंगणा चे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समिती प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाला देश पातळी वर व विकासाभिमुख राजकारण करण्या करिता आणि तेलंगणा मॉडेल संपूर्ण देशात पोहोचविन्या करिता विस्तार करीत आहे. त्या नुसार अनेक राज्यात पक्ष प्रचार व प्रसार करीत आहे.
महाराष्ट्र मध्ये सुद्धा पक्षाचा प्रसार व विस्तार चालू आहे. त्या अनुषंगाने अनेक महत्वपूर्ण कार्य, सभा, बैठकी केल्या जात आहे.
त्या करिता मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या मार्गदर्शना नुसार बी आर एस पार्टी चे महाराष्ट्र प्रभारी के वामश्रीधर राव यांच्या सल्ल्या नुसार पार्टी च्या विस्तार व प्रचाराला योग्य दिशा मिळावी त्या नुसार भारत राष्ट्र समिती सोशल मीडिया राष्ट्रीय प्रभारी जयंत देशमुख यांच्या आदेशा नुसार
महाराष्ट्र प्रभारी उदयराव घाटगे यांनी पुढील प्रमाणे विभागीय समन्वयक म्हणून नियुकी केल्या आहेत.नागपूर विभाग —
आकाश सुखदेवे, मराठवाडा विभाग –सत्यजित जोंधळे,नाशिक विभाग –शाहरुख पटवे,पुणे विभाग –शुभम क्षीरसागर,अमरावती विभाग —
प्रशांत भाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे . या नियुक्तीचे अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवारांनी स्वागत केले आहे.