वरोरा:- महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष पदी नितीन मायकरकर यांची सहाव्यांदा झाली निवड. ग्रामपंचायत कोसरसार येथील ग्रामसभेचे आयोजन २५ ऑगस्ट ला करण्यात आली.
ग्रामसभा आयोजित करण्यात आली त्यात ग्रामपंचायत चे सचिव कावळकर यांनी आपले प्रस्तावाचे अभिवाचन करून ग्रामसभेच्या अध्यक्ष पदी सरपंच गणेश मडावी यांची नियुक्ती करून सभेच्या कामकाजास सुरवात करून विविध विषय ग्रामसभेत मांडण्यात आले. नागरिकांना विविध योजनाची माहिती देण्यात आली त्यात प्रामुख्याने मोदी घरकुल योजना, शेळी शेड, कुकूटपालन सेड, गुरासाठी सेड अश्या बऱ्याच विषयावर सभेत मार्गदर्शन करण्यात आले.
गावातील तंटे हे गावात सुटायला पाहिजे या साठी तंटामुक्त समितीची स्थापना दरवर्षी करण्यात येते त्या साठी सभेत उपस्थित असलेल्या नागरिकांमधून एका सदस्यां ची निवड हे अध्यक्ष मनून सभेचे अध्यक्ष हे तंटामुक्त अध्यक्षाची निवड करत असतात. मागील पाच वर्ष नितीन मायकरकर हे तंटामुक्ती चे अध्यक्ष होते. त्यांनी अनेक प्रकरणाचा निपटारा केला त्यामुळेच पुन्हा सहाव्यांदा नागरिकांनी त्यांच्या नावाला पसंती देऊन अध्यक्ष पदी विराजमान केले. सहाव्यांदा निवड झाल्यामुळे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे ग्रामसभेसाठी सरपंच गणेश मडावी ,सचिव कावळकर, उपसरपंच अमित बहादुरे, नवनियुक्त पोलीस पाटील ऋषाली सांगोळले ,ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिकाची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.