चिमूर : स्पर्धा परीक्षेचं जग जसं चांगलं आहे, तसं घातक सुद्धा आहे. यामध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्हाला अभ्यासाचे पूर्वनियोजन करावे लागेल, असे प्रतिपादन शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम यांनी केले. २६ ऑगस्ट रोजी ब्राईटएज फाउंडेशन मार्फत सुरू असलेला मॅजिक उपक्रमाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
मॅजिकच्या माध्यमातूनविविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा देण्यात येत आहे. हे सर्व आदिवासी लोकांकडून मिळालेल्या देणगीतून व मदतीतून चालवण्यात येते. म्हणजे पे बॅक टू सोसायटीची संकल्पना रुजलेली आहे, ही अतिशय परिवर्तनशील व अभिनंदन या बाब आहे. याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे संजय बोधे यांनी मॅजिक मधील सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून यशाला गवसणी घालावी व समाजऋण परत करावे, असे मत व्यक्त केले.
अविनाश मेश्राम यांनी विद्यार्थ्यांसोबत हीतगूज साधत असताना स्वतः वापरत असलेल्या अभ्यासाच्या विषय सखोल मार्गदर्शन केले. त्यापूर्वी त्यांनी मॅजिक अभ्यासके विषयी माहिती जाणून घेत मॅजिकचे व्यवस्थापन, मॅजिक परिवारामार्फत राबवण्यात येणारे विविध उपक्रम, मॅजिकची फलनिष्पत्ती याची माहिती जाणून घेतली आणि मॅजिक उपक्रमाला 5 हजार रुपयेची आर्थिक मदत केली. यावेळी ब्राईटएज फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत एकुडे, साहस उपक्रमाचे संयोजक विलास चौधरी आणि मॅजिकचे विद्यार्थी उपस्थित होते.