चंद्रपूर:- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला व्यायामासाठी एक ते दोन तास काढणे शक्य नसते. पण चालणे ही अशी क्रिया आहे, जी तुम्ही सहज पूर्ण करू शकता. दिवसभरात किती पावले चालल्याने आरोग्याला फायदा होतो ते जाणून घेऊया
हृदयाच्या समस्या कमी होतील
युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीच्या अभ्यासानुसार, जर दररोज ५०० ते १००० पावले चालत असाल तर हृदयरोग किंवा इतर कोणत्याही कारणामुळे मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
दररोज किती पावले चालावे?
अभ्यासानुसार, दररोज किमान २३३७ पावले चालल्याने हृदयविकाराने मृत्यूचा धोका कमी होतो. तर दररोज सुमारे ३९६७ पावले चालल्याने इतर आजारांमुळे मृत्यूचा धोका कमी होतो. अभ्यासात असे आढळले की दररोज ५०० पावले चालल्याने हृदयविकाराने मृत्यूची जोखम ७ टक्के कमी होते, तर १,००० पावले चालल्याने हा धोका १५ टक्के कमी होत असल्याचे आढळले.
रोज किती पावले चालावे, याबाबत संशोधक सांगतात की, यासाठी कोणतीही निश्चित मर्यादा नाही. दररोज चालण्याने आरोग्य फायदे सतत वाढत जातात. हा निष्कर्ष २२६,८८९ लोकांवर केलेल्या १७ वेगवेगळ्या स्टडीवर आधारित आहे
काय सांगते WHO
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कमी शारीरिक हालचाली हे जगभरातील मृत्यूचे चौथे सर्वात सामान्य कारण आहे.
यामुळे दरवर्षी ३.२ दशलक्ष मृत्यू होतात. एका अंदाजानुसार, जगातील एक चतुर्थांश लोक असे जीवन जगतात,
ज्यांची शारीरिक हालचाल अतिशय कमी असतात.
सौजन्य : इंटरनेट