भद्रावती : डोळे हा मानवी देहाचा महत्त्वाचा अवयव आहे. त्याची निगा व काळजी आपल्याला स्वतःलाच व्यक्तीश: घ्यावी लागते . डोळ्यांची विशेष काळजी घेतली नाहीतर प्रसंगी जन्मभराचे अंधत्वही येऊ शकते. त्यामुळे सर्वांनी आपल्या डोळ्यांची योग्य पद्धतीने निगा राखली पाहिजे व डोळ्याचे संरक्षण केले पाहिजे असे विचार चंद्रपूर येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. गुंजन इंगळे (कांबळे) यांनी व्यक्त केले.
त्या स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात युगपुरुष स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक – मित्र मंडळ, अ.भा. ग्राहक मंच भद्रावती तथा विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डोळ्यांची काळजी व निःशुल्क नेत्र चिकित्सा शिबिरात मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी योद्धा संन्याशी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक – मित्र मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मते, ग्राहक मंचाचे अध्यक्ष वामन नामपल्लीवार, प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे सचिव माधव कवरासे प्रास्तविक प्राचार्य डॉ.उमाटे, आभार चंपत आस्वले यांनी केले. यावेळी भद्रावती शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात १३० नेत्र रूग्णांची तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी १४ लोकांचे आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे कार्ड काढण्यात आले. विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, सचिव अमन टेमुर्डे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या शिबिराचे यशस्वीतेसाठी प्रवीण चिमूरकर, वसंत वऱ्हाटे , सुदर्शन तनगुलवार, विठ्ठल मांडवकर, अण्णाजी कुटेमाटे, डॉ.रमेश पारेलवार, प्रा.अमोल ठाकरे, डॉ.उत्तम घोसरे, श्र्वेता कांचर्लावार, वैशाली सुर्यवंशी, राजेश यादव,डॉ यशवंत घुमे यांनी विशेष परिश्रम घेतले.