गडचिरोली:नगरपंचायत चामोर्शी येथे २३ ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी म्हणून श्रीकांत शरद फागणेकर रुजू झाले असून तब्बल २ वर्षानंतर स्थायी मुख्याधिकारी मिळाले आहे.
श्रीकांत शरद फागणेकर हे यापूर्वी साक्री धुळे नगरपरिषद येथे कार्यरत होते.त्यांचे स्थानांतर झाल्याने नगरपंचायत चामोर्शी येथे ते रुजु झाले.त्यांनी पदभार स्वीकारताच नगर पांच्यातच्या पदाधिकाऱ्यांनी पुषपगुच्छ देऊन स्वागत केले.
चामोर्शी नगरपंचायत येथील तत्कालीन मुख्याधिकारी सतिश चौधरी यांचे ८ सप्टेंबर २०२१ ला स्थानांतरण झाले.तेव्हा पासून येथील अतिरिक्त प्रभार उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांच्याकडे होता.जवळ पास २ वर्षानंतर आता चामोर्शी नगर पंचायतीला स्थायी मुख्याधिकारी मिळाले आहे. पदभार स्वीकारताच नगरपचायत कार्यश्रेत्रातील माहिती जाणून घेऊन कार्यालयीन कर्मचाऱ्याची त्यांनी आढावा बैठक घेत मार्गदर्शन केले.
यावेळी नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे, बांधकाम सभापती वैभव भिवापुरे, पाणी पुरवठा सभापती निशांत नैताम,बालकल्याण सभापती गिता सोरते, अभियंता निखिल कारेकर, कर्मचारी दिलीप लाडे, रमेश धोडरे, विजय पेद्दीवार , प्रभाकर कोसरे ,हाफिज सय्यद , सतोष भांडेकर , बाळा धोडरे , राकेश वासेकर , आकाश कोडवते , स्नेहल भुरसे , अलकेश बनसोड , प्रमोद राऊत , शुभांगी यारावार , सरस्वती राऊत , सुभाष कनकुटलावार , अशोक नवले , रमेश कनकुटलावार ,दिपक सातार उपस्थित होते .