गोंडपिपरी-महाराष्ट्र-तेलंगणा सिमा लागून असल्याने मोठया प्रमाणात सिमेलगत असणाऱ्या गोंडपिपरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी सुरू आहे.
आठवड्यात एक तरी कार्यवाही हे नित्य नियमाचेस झाल्याने गोंडपिपरी तालुका बदनाम होत आहे.तालुक्यातील दरूर येथे दर रविवारी बैल बाजार भरत असतो.दरूर वरून हाकेच्या अंतरावर तेलंगणा सीमा असल्याने तस्करांसाठी दरूर बाजार वरदान ठरत असल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.तेलंगणातील तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असून जनावरांना निर्दयीपने अनेकदा वाहतूक करताना आढळत आहे.दोन दिवसांपूर्वी गोंडपिपरी पोलिसांनी तेलंगणा येथील ८ जणांना अवैद्य वाहतूक करताना अटक करून गुन्हा दाखल केल्याची घटना नुकतीच घडली.भारताच्या राजपत्रात स्पष्ट उल्लेख आहे की राज्य सीमेपासून ५० किलोमीटरच्या आत कुठेही बैल बाजार भरवता येणार नाही.अशाही स्थितीत राज्य सीमेपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावात बैलबाजार भरत असून शासनाचे याला पाठबळ आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.एकंदरीत सीमावर्ती भागातील दरूर बैलबाजार तस्करांसाठी वरदान ठरत आहे.नियमबाह्य असणारे तात्काळ दरूर बाजार बंद करावे अन्यथा तीव्र जण आंदोलन करणार असल्याचा ईशारा राष्ट्रीय गौरक्षक किसान सभेने पत्रकार परिषदेतून दिला आहे.यावेळी प्रदेश अध्यक्ष अब्दुल सत्तार,सचिव विजय जनबंधु,कोशाध्यक्ष जुनेद खान,जिल्हा सचिव रियाज कुरेशी,तालुका अध्यक्ष विनोद तुमडे यांनी दिला आहे.
गोंडपिपरीत काही दिवसांपूर्वी बाजारसमितीच्या बाजूला गोशाळा होती.त्यानंतर ती अचानक गायब झाली तिथे आता एकही जनावरे नाहीत.याची योग्य चौकशी केल्यास गोशाळेच्या नावावर जनावरे तस्करी करणारे सापडतील.आंतरराष्ट्रीय तस्करी करणारा मोठा रॅकेट उघडकीस येईल-रियाज कुरेशी जिल्हा सचिव, गौरक्षक किसान सभा