गडचिरोली:-आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त जिल्ह्यातील ग्रामीण भागातून एका ध्येयवादी युवतीने पुणे सारख्या शहरात मॉडेलिंग क्षेत्रात आपल्या स्वप्नांना झळाळी देण्याचे काम केले आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागात असलेल्या नागेपल्ली येथील युवती निशा गोवर्धन हिने अतिशय कठीण परिस्थितीत मध्ये मॉडेलिंग जगतामध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.
नुकतेच 13 ऑगस्ट रोजी मुंबई-बेंगलोर हायवे वर असलेल्या सयाजी हॉटेल,पुणे येथे आयोजित एबीएम पुणे प्रस्तुत फॅशन व मॉडेलिंग शो मध्ये मिस युनिव्हर्स विजेती ठरली आहे.एवढेच नव्हेतर बिगेस्ट नॅशनल ब्युटी शोमध्ये सेकंड रनर ऑफ विजेती ठरली आहे.निशा गोवर्धन हिला लहानपणापासूनच फॅशन जगताबाबत विलक्षण असे आकर्षण निर्माण झाले होते.मात्र, आदिवासी बहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पर्याय नसल्यामुळे तिने अगोदर शिक्षण पूर्ण केले.तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण राजे धर्मराव हायस्कुल, नागेपल्ली,उच्च माध्यमिक शिक्षण राजे धर्मराव विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आलापल्ली येथे झाले.यर पदव्युत्तर शिक्षण सिरोंचा आणि आष्टी येथे पूर्ण केले.त्यानंयर तिने नर्सिंग कोर्स केले. मात्र, तिला आधीपासूनच मॉडलिंग क्षेत्रात आवड असल्याने तिचे स्वप्न तिला स्वस्त बसू देत नव्हते. अखेर तिने पुणे गाठले.
लहानपणापासूनच फॅशनच्या जगतामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करावे यासाठी शाळेतील होणाऱ्या स्पर्धेमध्ये निशा भाग घेत असत.तिला पुणे सारख्या शहरात या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आणि मिळालेल्या संधीचे तिने सोनं करून दाखविले. नुकतेच सयाजी हॉटेल पुणे येथे झालेल्या ए बी एम पुणे प्रस्तुत फॅशन व मॉडलिंग शोमध्ये मिस युनिव्हर्स विजेती तर बिगेस्ट नॅशनल ब्युटी शोमध्ये सेकंड रनर ऑफ विजेती ठरली.विशेष म्हणजे पाहल्याच प्रयत्नात तिला यश संपादन करता आले आहे.निशा गोवर्धन हिने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर मोठी झेप घेतली आहे. निशा संघर्ष करून पुढे गेलेली युवती आहे.खडतर प्रवास करताना ती मागे वळून पाहिले नाही त्यामुळेच मॉडेलिंग क्षेत्रात तिची ओळख निर्माण झाली आहे. पुढे याच क्षेत्रात तिला काम करायचे असल्याचे तिने सांगितले आहे.
पुणे येथील आयोजित स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून एसीपी हिरुळकर, चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर, चित्रपट निर्माते व अभिनेते आदित्य राजे मराठ, अभिनेते सुरज माने, क्रिकेटर जुरी ज्ञानेश भंगाळे,जुरी रेणू पवार,जुरी अतुल गुंजाळ, पुणे टू गोवा चित्रपट दिग्दर्शक अमोल भगत या सर्व मान्यवरांच्या हस्ते निशा गोवर्धन हिला सन्मानित करण्यात आले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.