गडचिरोली :- जिल्हा मुख्यालयापासून 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मुतनुर देवस्थान व कोठरी येथील बुद्धविहार आहे. मात्र,याचा विकास अजूनही झाला नाही.त्यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खूने यांनी प्रयत्न सुरू केले असून आता येथील विकास कामांना चालना मिळणार आहे.
प्रणय खुणे यांनी शासकीय नोकरीचा त्याग करून स्वतःच्या कर्तुत्वाने शून्यातून विश्व निर्माण करून गडचिरोली जिल्ह्यात बांधकाम व्यवसायात फार मोठी क्रांती घडवून आणली आहे.सामाजिक कार्यातून त्यांनी स्वतःचा एक वेगळा ठसा उमटविला आहे.आता त्यांनी मुतनुर आणि कोठरी या दोन ठिकाणांचा विकास करण्याचा संकल्प केला आहे.येथील विकास कामांना सुरुवात झाल्यास पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.सोबतच या परिसरातील बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी देखील मदत होणार आहे.
जिल्ह्यात अनेक पर्यटस्थळे आहेत.मात्र,मुख्य रस्ते,नदी नाल्यावर पुल नसल्याने आणि या पर्यटन स्थळांचा विकास झाला नसल्याने आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन स्थळ जगासमोर आले नाहीत.जर या पर्यटन स्थळांचा विकास झाल्यास पर्यटनाच्या मध्यामतून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणत महसूल प्राप्त होणार आहे.त्यातलाच एक मुतणुर हील स्टेशन असून येथील विकास कामासाठी प्रणय खुणे यांनी पुढाकार घेतल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.