अहेरी:- भारतीय जनता पक्ष हा कोणत्या परिवाराचा पक्ष नसून हा एक सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षांमध्ये सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो. सर्व कार्यकर्त्यांसोबत न्याय केला जातो. आपसी मतभेद विसरून सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एकजुटीने कार्य करावे. आपल्यावर कोणतीही अडचण निर्माण होऊ देणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी केले.
16 ऑगस्ट रोजी अहेरी तालुका मुख्यालयात माता कन्यका देवस्थान येथे आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या सभेत ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
यावेळी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव यांची प्रमुख उपस्थिती होती.तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा संघटन महामंत्री तथा संघटन प्रदेश सदस्य रवी ओलालवार,माजी जि प अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे,भायुमो जिल्हा उपाध्यक्ष दीपक सातपुते,भाजपचे अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध विषयावर चर्चा करतानाच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुका केव्हाही लागू शकतात. आपण सर्वांनी कामाला लागून प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जाऊन केंद्र व राज्य सरकारच्या योजना ‘घर घर चलो’ अभियानांतर्गत ग्रामीण भागामध्ये पोहोचवले पाहिजे व त्यांचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. सर्व शक्तीप्रमुख व बूथ प्रमुखांनी आपले बूथ सशक्तिकरण करून केंद्र व राज्य सरकारच्या योजना ‘घर घर चलो’ अभियानांतर्गत प्रत्येक बूथच्या माध्यमातून सामान्य जनतेला पोहोचविण्याचा काम सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन वाघरे यांनी केले.
तत्पूर्वी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे यांचे अहेरी नगरीत अगमणप्रित्यर्थ शॉल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यानंतर त्यांनी आपल्या मार्गदर्शनात पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडून पक्ष कसे मजबूत केले जाणार याकडे विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले.
यावेळी संतोष मद्दीवार भाजप महामंत्री अहेरी तालुका, मुकेश नामेवार तालुका महामंत्री,शंकर मगडीवार ओबीसी सेल जिल्हा महामंत्री, शक्तीकेंद्र प्रमुख, शेंडे तालुका महामंत्री, विनोद जिल्लेवार सोशल मीडिया संयोजक, शंकर कोडापे सरपंच बोरी, विकास उईके नगरसेवक, मोहन मदने भटके विमुक्त आघाडी जिल्हा महामंत्री, सागर डेकोटे भायुमो जिल्हा उपाध्यक्ष, अयान शेख, राकेश कोसरे सोशल मीडिया प्रमुख, प्रशांत ढोंगे माजी पं.स.सदस्य, कृष्णाजी माचालवार जिल्हा सहयोग मच्छीमार आघाडी,सौ.दिपाली नामेवार नगरसेविका,सौ.शालिनी पोहणेकर नगरसेविका,सौ.प्राजक्ता पेदापल्लीवार तालुकाध्यक्ष महिला मोर्चा,सौ.हर्षताई ठाकरे व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते शक्ती केंद्रप्रमुख व बूथ प्रमुख खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.