वरोरा: भाजपा वरोरा शहर व ग्रामीणच्या वतिने मोठया उत्साहात स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. आज भारत देशाला स्वातंत्र होवून 76 वर्षे पूर्ण झाले. आज देशात लोकशाही नांदत आहे त्याचे श्रेय नरेंद्र मोदी यांना दिल्या जात असल्याचे मत डॉ. आगलावे यांनी यावेळी व्यक्त केले.
या देशात स्वातंत्र मिळवून देण्यासाठी अनेक हुतात्मांनी बलिदान दिले. सर्व वीर सपुत्रानी देशाच्या सार्वभौमत्व रक्षण करून प्राणांची आहुती दिली. त्यांचे बलिदानमुळे देशाला स्वातंत्र मिळाले.
तसेच भारताच्या सीमेचे रक्षण करणा-या सैनिकांचा देशाचे स्वातंत्र अबाधीत राखण्याचा सिंहाचा वाटा आहे. कोणतेही परकीय आक्रमणांना पळवून लावून देशाचे सीमेचे रक्षण करून प्राणाची आहुती भारतीय सैनिक देत आहे. यावेळी भाजपा ग्रामीण व शहराचे सर्व भाजपा पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.