वरोरा:- महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणारी सावित्रीबाई फुले यांची पुण्याई असल्याचे प्रतिपादन श्री. गुरूदेव प्रचारक तथा केंद्रीय मानवाधिकार संगठनचे विदर्भ अध्यक्ष डॉ. अंकुश आगलावे यांनी गणेश मंडळ, कुंभार मोहल्ला वरोरा आयोजित कार्यक्रम केले.
महात्मा फुले चौक कुंभार मोहल्ला वरोरा येथील गणेश मंडळाची स्थापना 15 ऑगस्ट 1997 रोजी करण्यात आली. या मंडळाने महात्मा फुले यांचे स्मारक बनविले. या मंडळाच्या वतिने स्वातंत्रदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी डॉ. आगलावे यांनी गणेश मंडळाने महात्मा फुले चौक व स्मारकाचे बांधकाम करणा-या वाणीजी व गणेश मंडळाच्या पदाधिका-यांना अभिनंदन केले. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याची उजळणी देत महिलांना शिक्षणाचे दारे उघडे करून दिली तसेच आज सर्वोच्च पदावर विराजमान महिला फक्त सावित्रीबाईच्या पुण्याईने झाले असल्याचे सांगितले.
यावेळी कार्यक्रमात डॉ. भगवान गायकवाड, बाबा भागडे अहतेशाम अली, सुरेश महाजन, डॉ. सागर वझे , रूपलाल कावळे मधुसूधन टिपले, आकाश भागडे, शुभम चांभारे किशोर टोंगे, आदिवासी संगठन, संभाजी राजे संगठन, मानवाधिकार संगठन व श्री. गुरूदेव मंडळाचे प्रचारक मोठया संख्येने उपस्थित होते.