गडचिरोली:बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरु केले व त्याचे नावही अगदी योग्यच होते.दर्पण म्हणजे आरसा. समाजात सामाजिक,आर्थिक, शासकीय, राजकिय, शैक्षणिक अशा विविध पातळीवर जे घडते त्याचे पडसाद वृत्तपत्रात उमटतात.त्यामुळे वर्तमानपत्रे हे समाजमनाचा आरसा आहेत.असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.बुधवार (16ऑगस्ट) रोजी सह्याद्रीचा राखणदार या मराठी साप्ताहिकाचा 6 वा वर्धापन दिनानिमित्त नागेपल्ली येथील कार्यालयात साप्ताहिक पेपरचा लोकार्पण सोहळा त्यांच्याहस्ते पार पडला,यावेळी ते बोलत होते.
माजी जि.प.अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे,भाजपचे अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री यांची प्रमुख उपस्थिती होती.तर प्रमुख पाहुणे म्हणून मुकेश नामेवार, नागेपल्ली चे उपसरपंच रमेश शानगोंडावार,प्रशांत नामनवार, ग्रा प सदस्य मल्लारेडी येमनुरवार, किशोर रापेल्लीवार,मोहन खोब्रागडे,सुनतकरजी, प्रशांत रागीवार,शुभम कुत्तरमारे,विकास तोडसाम,आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गतीने इतरही प्रसार माध्यमे आलीत. मात्र, वृत्तपत्रांनी आपले अस्तित्व टिकवून आजही दीपस्तंभासारखे दिमाखाने उभे आहे. आज शहरच नव्हे तर ग्रामीण भागापर्यंत वृत्तपत्राचे जाळे पसरले आहे. शाळा-महाविद्यालयांतुन युवक युवतींचा वाचक वर्ग तयार झाला आहे.
खरंतर वृत्तपत्रे ही समाज व मानव यांना जोडणारा सकारात्मक दुवा आहे. प्रत्येकांच्या गरजा पुरवण्याचे काम वृत्तपत्रे करतात. मग ती नोकरीसाठी रिक्त पदे असो की जागा खरेदी-विक्री असो, नाटक सिनेमा, साहित्य संबधातली माहिती, शासकीय योजना आदी सर्व माहिती समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचविण्याचे सक्षम माध्यम असून सह्याद्रीच्या माध्यमातून आपल्या भागातील विविध प्रश्न मांडावे असे आवाहनही त्यांनी केले.
माजी जि प अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांनी दिनदुबळ्यांचा कैवारी वैश्विक माहिती समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचविण्यचे काम वर्तमानपत्रांतून होते. त्यामुळे समाज प्रगतीत, देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे. समस्त जनांचा, गोरगरिबांचा, महिलावर्गांचा, दिनदुबळ्यांचा कैवारी म्हणून वर्तमानपत्राची जबाबदारी आहे. आणि ती आज निःस्वार्थपणे पार पाडली जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केली.
सह्याद्रीचा राखणदार या साप्ताहिक अंकाचे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याहस्ते फित कापून दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आले आणि त्यांनतर त्यांनी स्वतः लॅपटॉप हाताळत सह्याद्रीच्या साईट वर जाऊन ई पेपर लिंक उघडुन वाचनही केले.यावेळी त्यांनी अहेरी सारख्या भागात कार्यालय उघडल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिले.