शुक्रवारच्या मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास अर्टिगा गाडी चेंबूरच्या दिशेने सुसाट वेगाने जात होती. तेव्हा कुर्ला परिसरात हा अपघात झाला. अर्टिगा SCLR पुलावर येताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. या कारचा वेग इतका होता वीजेच्या खांबाला धडकताच कारचे दोन तुकडे झाले. कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.
मुंबईतील कुर्ला परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने जाणारी अर्टिगा कार विजेच्या खांबाला धडकून भीषण अपघात झाला. ही धडक इतकी जबर होती की कारचे अक्षरश: दोन तुकडे झाले. या अपघातात कारमध्ये बसलेल्या २ मुलींसह ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. नेहरू नगर पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना जवळच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सुमारे १ तासाच्या अथक प्रयत्नानंतर विजेच्या खांबामध्ये अडकलेली कार बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं. यानंतर कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात झाला तेव्हा कारमध्ये एकूण पाच जण प्रवास करत होते. यामध्ये दोन मुलींचा समावोश होता. सध्या या पाचही जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(टीम सह्याद्रीचा राखणदार)