गोंडपिपरी :- जिल्हा परिषद-पंचायत समितीचा कार्यकाळ संपला असून निवडणुका केव्हाही लागू शकतात.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जबाबदार पदाधिकारी युवा नेत्याची भाजपात घरवापसी होणार असून काँग्रेससाठी मोठा धक्का मानल्या जात आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याकडे राजुरा विधानसभा भाजपा अध्यक्षपदाची जबाबदारी आली.भोंगळे यांचे आज राजुरा मध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन पार पडणार आहे.त्याचेच औचित्य साधत गोंडपीपरी काँग्रेस चा बडा युवा नेता आज भाजपात प्रवेश करणार असल्याचे जवडपास निश्चित झाले असून तशी दबक्या आवाजात त्या काँग्रेस युवा नेत्याच्या समर्थकांकडून प्रवेशाच्या चर्चा केल्या जात आहे.युवा नेत्याची घरवापसी होणार असल्याने भाजपात नवचैत्यन निर्माण झाले आहे.