गोंडपिपरी(सुरज माडुरवार) :- काल दि.(८) शनिवारी सकाळची शाळा संपल्यानंतर चार मूल वर्धा नदीच्या पात्रात पोहायला व खेकडे पडकडायला गेलीत. त्यातील एक मुलगा परत आला.आणि तीन मित्र वाहून गेल्याचे सांगितलं. गावाकर्यांनी लगेच नदी पात्राकडे धाव घेतली होती. नदी किनाऱ्यावर मुलांचे कपडे दिसून आलेत. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली होती.प्रतिक नेताजीबजुनघरे,निर्दोष ईश्वर रंगारी,सोनल सुरेश रायपुरे अशी बेपत्ता असलेली मुले आहेत. सर्व मुले दहा वर्ष वयोगतील आहेत.गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे ही दुदैवी घटना घडली आहे.या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.काल मुलांचा शोध लागलेला न्हवता.
प्राप्त माहिती नुसार,गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या तोहोगाव येथील
प्रतिक नेताजी जुनघरे,निर्दोष ईश्वर रंगारी,सोनल सुरेश रायपुरे, आरुष प्रकाश चांदेकर ही चार मुले वर्धा नदी पात्रात पोहायला व खेकडे पकडायला गेलीत. त्यापैकी आरुष प्रकाश चांदेकर हा घरी परत आला. त्याने तीन मित्र नदीत वाहून गेल्याचे गावात सांगितले. गावाकर्यांनी लगेच नदी पात्राकडे धाव घेतली. नदी पात्रजवळ मुलांचे कपडे दिसून आलेत. त्यामुळे मूलं वाहून गेली असावी अशी शंका वाढली. मुलांचा आई वडीलानी एकच टाहो फोडला. पोलीस विभागाने व तहसीलदार शुभम कदम यांनी घटनास्थळ गाठून शोध मोहीम सुरु केली आहे.अद्याप मुलांचा पत्ता लागलेला नाही. वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झालेली आहे. त्यामुळे शोध मोहिमेत अडथळा निर्माण होत आहे.युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून अखेर प्रतीक जुंनघरे चा मृतदेह सापडला असून उर्वरित दोन मुलांचा शोध सुरू आहे