गोंडपिपरी-(सुरज माडुरवार) :– तालुक्यातील तोहंगाव येथील वर्धा नदीत पोहायला गेलेले ३ शाळकरी मूल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची खळबळजनक घटना आज दि.(८) शनिवारी दुपारी दोन वाजता दरम्यान घडली.
तोहगाव वरून दोन किलोमीटर शिंदी जवळ असणाऱ्या वर्धा नदीत १० ते ११ वयोगटातील ४ मित्र पोहायला गेले त्यापैकी ३ जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली .नदी पात्रावर त्यांचे कपडे व पादत्राणे असल्याने हा अंदाज बांधल्या जात आहे.वाहून गेल्यामध्ये १)प्रतिक नेताजी जुनघरे २)निर्दोष ईश्वर रंगारी ३)सोनल सुरेश रायपुरे ही मुले असल्याची चर्चा असून आरुष प्रकाश चांदेकर हा मुलगा मात्र पाण्यात न उतरल्याने घरी वापस आल्याचे बोलल्या जात आहे.गावातीलच एका महिलेने ३ मुलांना पाण्यात वाहून जाताना बघीतल्याने युद्धस्तरावर शोध मोहीम सुरू असून घटनास्थळी लाठी व कोठारी पोलीस दाखल झाले आहे.अध्याप मुलांचा शोध लागला नाही.