वरोरा :अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीवर मात करून ग्रामीण भागातील मुलगी पीएसआय झाली. ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता आदर्शवत प्राप्ती असून दिशादर्शक घटना आहे.
वरोरा तालुक्यातील गीरोला या गावची मुलगी, तनुजा गोकुलदास खोब्रागडे, हीची पीएसआय पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे. तनुजा ही अगदी सामान्य गरीब कुटुंबातून वाढलेली मुलगी आहे. तनुजाचे आईवडील मोलमजुरी करतात. सावरी येथील कर्मवीर शाळेत तिचे शिक्षण पार पडले. पुढील शिक्षण तिने चंद्रपूर मधून घेतले. घरची आर्थिक परिस्थिती नसताना व कुठलेही आवश्यक संसाधन उपलब्ध नसताना तनुजाने हे यश साध्य केले आहे. ही संपूर्ण गावासाठीच नाही तर या संपूर्ण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. तनुजा ही त्या गावातील पीएसआय झालेली पहिली मुलगी आहे.
तनुजाच्या या यशाबद्दल शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे हे उपस्थित होते. त्यांनी तनुजाचे कौतुक केले. व तिचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगितले.
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे तिच्या भावी आयुष्याकरीता कोणतेही सहकार्य लागल्यास ते पूर्ण करण्याची ग्वाही देखील ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे यांनी दिले आहे.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, माजी नगरसेवक प्रशांत कारेकर, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अभिजित पावडे, प्रा. जयवंत काकडे, बालनंद मोडक, पारडीच्या सरपंच वंदना जूनघरे, रोशनी काकडे, पोलीस पाटील मंगला बलकी, आदी उपस्थित होते.