शंकरपूर:- शंकरपूर येथील प्रगतशील शेतकरी शेषराव राऊत व जवराबोडी येथील शेतकरी कमलाकर ठाकरे यांनी विषमुक्त सेंद्रिय शेती करून उत्पादनात वाढ केली त्यामुळे किसान क्रॉप केअर अँड मल्टी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड अमरावती या कंपनीच्या वतीने कृषी दिनाचे औचित्य साधून व कंपनीचा आठव्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार करण्यात आला
दिवसेंदिवस जास्तीत जास्त रासायनिक खताचा वापर करून शेतकऱ्यांनी शेत जमिनीशी स्पर्धा निर्माण केली जास्त उत्पादन घेण्याच्या नादात रासायनिक खते व रासायनिक औषधे प्रमाणाबाहेर वापरून शेतजमिनी नापीक होऊ लागल्या मातीची उगवण क्षमता कमी होऊ लागली त्यामुळे आज सेंद्रिय खते व सेंद्रिय औषधी वापरून जमिनीची पोत सुधारणे व जमीन सुपीक करणे आवश्यक झाले आहे त्यामुळे सेंद्रिय शेती ही काळाची गरज निर्माण झाली आहे
परिसरातील या दोन शेतकऱ्यांनी मागील वर्षी 100% सेंद्रिय खते व औषधांचा वापर करून रासायनिक शेतीपेक्षा जास्त विषमुक्त उत्पादन घेऊन तालुक्यात आदर्श निर्माण केला जवराबोडी येथील शेतकरी कमलाकर ठाकरे यांनी चार वर्षापासून शेतीमध्ये सेंद्रिय खते व औषधांचा वापर करून दरवर्षी उत्पादनामध्ये वाढ करून घेतली त्यामुळे ही प्रेरणा घेऊन परिसरातील शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनात विषमुक्त सेंद्रिय शेती करावी व उत्पादनात वाट करावी व त्यामुळे जमिनीची सुपीकता ही वाढवून घ्यावी
याची दखल घेऊन अमरावती येथील किसान क्रॉप केअर अँड मल्टी सर्विसेस कंपनीने कंपनीच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त व एक जुलै कृषी दिनानिमित्त अमरावती येथे या दोन्ही शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला