गोंडपिपरी -(सुरज माडुरवार) :- गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे गेल्या वर्षभरापासून विजेचा लपंडाव सुरू असून नागरिक त्रस्त आहे. वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांना समस्या मार्गी लावा असे सांगून देखील महावितरण कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.दि(१)शनिवारी रात्री दहा वाजता गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विकास पंदीलवार यांनी महावितर गोंडपिपरी सहाय्यक अभियंता राणा यांना फोन लावून वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात माहिती दिली असता राणा यांनी त्यांचा नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला सोबतच गावातील अनेकांनी त्यांना फोन करून ही माहिती दिल्यावर त्या सर्वांचे नंबर त्यांनी ब्लॉक लिस्ट मध्ये टाकून प्रतिसाद दिला नाही .अखेर संतप्त गावकऱ्यांनी रात्री बारा वाजता महावितरण कार्यालयावर धडक दिली. तीन तास त्या ठिकाणी थांबल्यानंतर महावितरणचे अधिकारी कातकर यांच्याशी संपर्क झाला कातकर यांनी तात्काळ दखल घेत काही अधिकाऱ्यांना पाठवून विद्युत पुरवठा रात्री तीन वाजता सुरळीत केला. विद्युत पुरवठा खंडित ही समस्या बोरगाव येथे वारंवार असून वायरमन सागर भूषणवार हे मुख्यालयी राहत नसल्यामुळे चंद्रपूर वरून ये-जा करत असल्याने ही समस्या उद्भवत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. आठवडाभरात कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास मोठा जन आक्रोश मोर्चा काढणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. सरपंच ललिता बोरकुटे ,सदस्य महेंद्र जीवने, सुधाकर भसारकर,चेतन कुंभारे,राजकुमार मानकर,राजकुमार कुकुडकर,मंगेश फुलझले,मंदा मानकर,सविता मानकर, विजेता कुंभारे,अहिल्याबाई फुलजले, निराशा पंदीलवार,शिला एलमुले, रंजीत उराडे,संघरक्षित निमगडे, विनायक कुकुडकर,मुकुंद एलमुले यांनी रात्री महावितरणवर धडक दिली.