शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर कार्यकर्त्यांचा विश्वास
वरोरा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आदेशान्वे जानेवारी २०२३ ला वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुखपदी रवींद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. रवींद्र शिंदे यांनी केलेले कार्य, कामाप्रती निष्ठा, संघटन कौशल्य याच्या जोरावर तसेच नागरिकांचा रवींद्र शिंदे यांचा नेतृत्वावर विश्वास दाखवीत विधानसभा क्षेत्रातील तसेच इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश घेतला.
यात सामाजिक कार्यात अग्रेसर महिलासुद्धा रवींद्र शिंदे यांचा नेतृत्वावर पक्षाशी जुळल्या व जुळत आहेत. मध्यवर्ती कार्यालय “शिवालय” वरोरा येथे शुभांगी विजय डाखरे व प्रा. प्रीती पोहाने यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. महिला शिवसैनिक तथा भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती उपाध्यक्ष अश्लेषा मंगेश भोयर यांचा उपस्थितीत शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नर्मदा बोरेकर तसेच वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या हस्ते श्रीफळ व शिवबंधन बांधून पक्षप्रवेश पार पडला. तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
याप्रसंगी आभासी पद्धतीने बोलतांना रवींद्र शिंदे म्हणाले कि वरोरा-भद्रावती मध्ये शिवसेना अधिक भक्कम करण्यासाठी टाकलेलं एक सकारात्मक पाऊल म्हणायला हवं. यांचं शिवसेनेत मनापासून स्वागत. सगळ्या शिवसैनिकांना सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तसेच शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे गावपातळीवरील प्रश्न सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू.
याप्रसंगी भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती अश्लेषा जिवतोडे भोयर, शिवसैनिक चिंतामणी मांडवकर, विजय मधुकर डाखरे,रुपेश चिंचोलकर, उज्वल काळे, ओंकेश्वर टोंगे,अक्षय बंडावार, निखिल मांडवकर, सृजन मांढरे तसेच शिवसैनिक महिला कार्यकर्त्या व शिवसैनिक उपस्थित होते.