गोंडपिपरी –गोंडपिंपरी तालुक्यातील लाठी येथे ‘शासन आपल्या दारी’ अभियान अंतर्गत नुकतंच लाठी येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तहसीलदार राजेश मडामे, तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार, लाठीचे सरपंच विनोद जगताप, उपसरपंच साईनाथ कोडापे, सरपंच पोळसा देविदास सातपुते ,नायब तहसीलदार गेडाम, निरीक्षक मेश्राम, मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे,प्रशांत बैस ,कृषी पर्यवेक्षक पाटील,परिसरातील कृषी सहाय्यक, तलाठी,ग्रामसेवक ,ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शासन आपल्या दारी उपक्रम घेण्यामागे शासनाचा उद्देश काय हे यावेळी तहसीलदार राजेश मडामे यांनी उपस्थितांना पटवून सांगितले.सोबतच तालुका कृषी अधिकारी पवार यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची यावेळी माहिती दिली व कृषी विभागातर्फे कृषी यांत्रिकीकरण अभियान अंतर्गत मारोती मडावी रा.पारडी यांना ट्रॅक्टर वाटप करण्यात आले .एकात्मिक फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग प्रस्ताव मंजूर करून पूर्वसंमती पत्र बाबुराव आस्वले रा. वेजगाव यांना देण्यात आले. तहसील कार्यालया मार्फत राशन कार्ड वितरित करण्यात आले . विविध दाखले व सातबारा वितरित करण्यात आले. संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजना प्रकरणे तयार करण्यात आली. नवीन राशन कार्ड करिता अर्ज भरून घेण्यात आले जातीचे दाखले करिता प्रकरणे मंजूर करण्यात आले .यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त करत शासन आपल्या दारी या उपक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने उपस्थित राहून घेतला