गोंडपिपरी :- उद्योगविरहित गोंडपिपरी तालुक्याची मदार शेतीवर आहे.शेती,शेतीपूरक व्यवसाय आणि शेतमजूरी करुन तालुक्यातील नागरिक जीवन जगतात.धान,कापूस,तुळ,मक्का यासारख्या पिकांचे उत्पन्न घेऊन येथिल नागरिक आपले जिवनमान उंचावण्याचा प्रयत्न करित आहेत.यातून कुटूंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांचा रोजचा संघर्ष सुरु आहे.असे असतांना मात्र तालुक्यात उत्पन्न होणाऱ्या मालाला खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना विक्रीसाठी भटकावे लागते.यामूळे गोंडपिपरी तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मक्का खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी बाजार समितीच्या नवनियुक्त संचालकांनी केली होती. या पाठपुराव्याला यश आले (दि.८ जून रोजी) गोंडपिपरी मक्का खरेदी केंद्राचा शुभारंभ ठरला. उद्घाटक म्हणून राजूरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अॕड.संजय धोटे,कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सुदर्शन निमकर यांना पाचारण करण्यात आले. मात्र प्रोटोकॉल नुसार हा कार्यक्रम होत नसल्याची तक्रार काँग्रेसच्या सहा संचालकांनी सभापती यांच्याकडे केली. शासकीय मक्का खरेदी केंद्राचे उद्घाटन प्रोटोकॉल नुसार जिल्ह्याचे पालकमंत्री, विधानसभेचे आमदार किंवा तहसीलदार अथवा कृषी अधिकारी तसेच बाजार समितीचे सभापती व उपसभापती यांच्याकडून होणे अपेक्षित होते मात्र बाजार समितीवर भाजप ची सत्ता असलेल्या सभापती उपसभापती व संचालकांनी कुठलीही बैठक न बोलविता इतर संचालकांना विश्वासात न घेता हा कार्यक्रम ठरवला व प्रोटोकॉल न पाडता कुठल्याही शासकीय पदावर नसलेल्या पक्षाच्या नेत्याकडून कार्यक्रमाचे उद्घाटन तथा अध्यक्ष पदी स्थान दिल्याने ही बाब नियमाला उल्लंघन करणारी असून या कार्यक्रमावर आक्षेप घेतला दिनांक ८जून रोजी शासकीय धान्य गोडाऊन येथे उद्घाटन कार्यक्रम सुरू होताच काँग्रेस चे सहा संचालक यांनी तहसीलदार राजेश मडामे यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत उद्यापासून सुरू होत असलेल्या शासकीय मक्का खरेदी केंद्राचे उद्घाटन प्रोटोकॉल नुसार घेत नसल्याचे कळविले. कोरपना येथील केंद्राला हि मान्यता असून कार्यक्रम पत्रिका व पाहुणे ठरविण्याचा अधिकार कोरपना येथील केंद्राचा असताना हेतूपरसपर बाजार समिती इतर संचालकांना विश्वासात न घेता सदर कार्यक्रम घेत असल्याचे कळविले. सदर केंद्राकडून मालाची अधिकृत पावती कुणीच अधिकारी आणले नसतांना, मक्का केंद्राला अद्याप मान्यता मिळाली नसतांना ,मक्का खरेदी चे अधिकृत पोर्टल सुरू नसतांना शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचा देखील आरोप काँग्रेस संचालकांकडून करण्यात आला.त्यामुळे शासकीय गोडाऊन येथे सुरू केलेल्या मक्का केंद्रात काही वेळ संम्रंमभाची स्थिती निर्माण झाली.तर.शासकीय मक्का केंद्र हा शासनाचा उपक्रम असून बाजार समिती यात जाणीवपूर्वक हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप काँग्रेस संचालक अशोक रेचनकर, निलेश संगमवार, देविदास सातपुते, प्रेमिला चणेकर ,नारायण वागदरकर व संतोष बंडावार यांनी केला. मात्र शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही आणलेला माल वापस जाऊ देणार नाही अशी सामन्यजशाची भूमिका घेत शेतकर्यांनी आणलेला माल हा सभापती व शेतकरी यांच्या विनंती ने व्यवस्थापक यांच्याशी बोलून गोडाऊन मध्ये काटा करून मक्का खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला .विक्रीसाठी सुरवातीस आलेल्या शेतकऱ्यांचा मक्का काटा करण्यात आला.नंदवर्धन येथिल शेतकरी दिवाकर धूडसे आणि शिवणी येथिल खूशाबराव ढूमणे यांनी प्रथमता मक्का आणल्याने त्यांचा शाल,श्रिफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार,बाजार समितीचे सभापती ईंद्रपाल धूडसे,उपसभापती स्वप्निल अनमुलवार,भाजपचे तालुकाध्यक्ष बबन निकोडे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरज माडूरवार,कृउबासचे संचालक महेंद्रसिंह चंदेल,निलेश पुलगमकर,गणपती चौधरी(गुरुजी),सुहास माडूरवार,रितेश वेगिनवार,चंद्रजित गव्हारे,संदिप पौरकार,समिर निमगडे,विजय पेरकावार आदिसह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
मका खरेदी नियमबाह्य….
मका खरेदी केंद्र नुकतंच सुरू करण्यात आले ते नियमबाह्य असून शेतकऱ्यांची दिशाभूल करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी साठी केलेले हा केविलवाणा प्रयत्न आहे.कुठलाही प्रोटोकॉल पाडण्यात आला नाही.काल खरेदी करण्यासाठी नेमून दिलेल्या संस्थेचे कोणीही पदाधिकारी आले नाही.दिखावा करण्यासाठी मका खरेदी करण्यात आले.शुक्रवारी अनेक शेतकरी मका विक्री साठी येऊन परतले शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्यांचा निषेध
-निलेश संगमवार
संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती
गोंडपिपरी