भद्रावती : तालुक्यातील शेतकरी बांधवानी पेरणीकरणासाठी बी-बियाणे व खते त्याचप्रमाणे किटकनाशके काळजीपूर्वक घ्यावी तसेच त्यांनी नामांकित बियाण्याची खरेदी करावी जेणेकरून बोगस बियाण्याचे संकट येणार नाही. पॉकेट सील प्रमाणित केलेले आहे का? याची खात्री करून खरेदी करावी, असे आवाहन ग्राहक पंचायत भद्रावती द्वारे करण्यात आले.
कीटकनाशके यांचे डबे, कॅन हे चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करावी. पक्के बिली वापरलेले बियाणे यांचे नमुने सांभाळून ठेवावे, रिकाम्या पिशव्या व पोती पीक हाती येई पर्यंत फेकू नयेत. कारण त्यावर सर्व तपशील लीहलेला असतो. बियाण्यामध्ये किंवा खतामध्ये काही दोष असल्यास त्याचप्रमाणे काही तक्रार असल्यास किंवा निर्माण झाल्यास यावस्तू आवश्यक असतात. कीटकनाशके त्यावर लीहलेल्या सूचनेनुसार काळजीपूर्वक वापरावी जेणेकरून कोणताही धोका निर्माण होणार नाही. गरज पडल्यास कृषीअधिकारी वा तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
योग्य तक्रार असल्यास मार्गदर्शनासाठी ग्राहक पंचायत भद्रावतीशी संपर्क साधावा, असे आवाहन शेतकरी ग्राहक बांधवाना अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, ग्राहक पंचायत भद्रावती चे वामण नामपल्लीवार, वसंत वऱ्हाटे, पुरूषोत्तम मस्के, प्रवीण चीमूरकर, सुदर्शन तनगुलवार यांनी केले. तसेच शेतकरी ग्राहकांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करावा असे आवाहन केले.