घुग्घुस :- शहरातील शिवनगरकडे जाणारा मुख्य रस्त्याची काही महिन्यापासून मोठी दुर्दशा झाली होती. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्रस्त झालेल्या वार्डवासियांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना ही समस्या सांगितली
ही समस्या लक्षात घेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले त्या अनुषंगाने शिवनगरकडे जाणाऱ्या मुख्य मार्गापासून ते शिवनगर वसाहतीपर्यंत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला मंजुरी मिळाली असून या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात येणार आहे.
रविवार, ४ जून रोजी सकाळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे संजय तिवारी, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, सिनू इसारप, मल्लेश बल्ला, अरुण दामेर, शेखर गोडसेलवार, विशाल दामेर व वार्डवासियांनी शिवनगरच्या मुख्य मार्गाची पाहणी केली.
याप्रसंगी शिवनगरकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन करून काम दोन दिवसात सुरू करण्यात येणार आहे असे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी सांगितले आहे.