गोंडपिपरी-सलोध्या आठवडा भरापासून गोंडपिपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळ वारा सुरू असून अशा स्थितीत चेकदरूर येथील मानवी वस्थी जवळ असलेल्या तनसीच्या ढिगाराला आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.
दि.५(सोमवारी) दुपारी बारा वाजता दरम्यान अचानक प्रविण येलमुले यांच्या व शेजारी असणाऱ्या तनसीच्या ढिगारांना मोठी भीषण आग लागली.गावकऱ्यांनी घटनेची माहिती ठाणेदार जीवन राजगुरू,संवर्ग विकास अधिकारी शालीकराव माऊलीकर यांना दिली उन्हाड्याचे दिवस असल्याबे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अग्निशामक दल नगरपंचायत चे वाहन पाठवून गावकऱ्यांच्या सहकार्याने आग विजवण्यात यश मिळवले त्यामुळे मोठा अनर्थ टळला .